नवी दिल्ली : देशातील कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या काही दिवासांतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर पडली आहे. रविवारच्या तुलनेत आज काही प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या कमी आली आहे. गेल्या 24 तासात देशात 3 लाख 66 हजार 161 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून 3754 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 3.53 लाख रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. 


देशात कोरोनाची आजची स्थिती
मागील 24 तासातील नव्या रुग्णांची संख्या - 3 लाख 66 हजार 161
मागील 24 तासातील कोरोनामुक्तांची संख्या - 3 लाख 53 हजार 818
मागील 24 तासातील मृतांची संख्या - 3 हजार 754
एकूण कोरोनाबाधितांची संख्या - 2 कोटी 26 लाख 62 हजार 575
एकूण कोरोनामुक्तांची संख्या - 1 कोटी 86 लाख 71 हजार 222
एकूण सक्रिय रुग्णांची संख्या - 37 लाख 45 हजार 732
एकूण मृतांची संख्या - 2 लाख 46 हजार 116
एकूण लसीकरण - 17 कोटी 01 लाख 76 हजार 603 


महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येची स्थिती
रविवारी राज्यात 48,401 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर 60,226 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात गेल्या 24 तासात 572 कोरोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 44,07,818 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.4 % एवढे झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय येत्या 15 तारखेला घेणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामुळं काही जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यामध्ये संपूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.  जास्त रूग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांत कडकडीत लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही, यावर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा असं मत हायकोर्टानं देखील व्यक्त केलं होतं.


महत्वाच्या बातम्या :