मुंबई : कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला रुग्ण खबरदारी म्हणून स्वत:ला घरातच विलग करतो त्याला होम क्वॉरन्टीन म्हणजेच गृहविलगीकरण म्हणतात. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या असलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जातो. महाराष्ट्रात सध्या जवळपास 37 लाख व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांसाठी केंद्र सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. या नियामानुसार तीन पदरी वैद्यकीय मास्क आठ तासांनी बदलण्याची सूचना करण्यात आली आहेत. तसंच विलगीकरणातील रुग्णांसाठी खोलीला स्वतंत्र स्नानगृहाची सुविधा असावी असंही सांगण्यात आलं आहे.


हे नियम कोणकोणते आहेत ते आपण जाणून घेणार आहोत...


1. गृह विलगीकरणातील रुग्णांसाठी खोलीला संलग्न-स्वतंत्र स्नानगृहाची सुविधा पाहिजे


2. इतर आजार आणि वृद्ध रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गृह विलगीकरणाची परवानगी द्यावी


3. गृह विलगीकरणात पूर्णवेळ रुग्णांची काळजी घेणारी व्यक्ती असावी


4. रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीचा रुग्णालयाबरोबर नियमित संपर्क असावा


5. रुग्णांनी घरात असतानाही तीन पदरी वैद्यकीय मास्क वापरला पाहिजे, आठ तासांनंतर हा मास्क बदलणं गरजेचा


6. रुग्ण राहत असलेल्या खोलीत हवा खेळती राहिली पाहिजे


7. रुग्ण राहत असलेल्या खोलीतील टेबलचा पृष्ठभाग, दाराच्या कड्या, हॅण्डल यासारख्या गोष्टी फिनाईलने स्वच्छ करणं गरजेचं


8. गृह विलगीकरणात दहा दिवस राहिल्यानंतर रुग्णाला कोणताही त्रास नसल्यास रुग्णाचे विलगीकरण संपेल


9. रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन घेऊ शकते