लखनऊ : विकासकामांच्या श्रेयवादाची लढाई आपण पाहिलीच असेल. त्यासाठी नको नको त्या क्लृप्त्याही वापरलेल्या आपण पाहिल्यात. मात्र उत्तर प्रदेशातील सीतापुरात चक्क ब्लँकेट वाटपाच्या श्रेयासाठी थेट भाजप खासदार विरुद्ध भाजप आमदार अशी लढाई पाहायला मिळाली.
भाजप खासदार रेखा वर्मा आणि भाजप आमदार शशांक त्रिवेदी यांच्यात ब्लँकेट वाटपाच्या श्रेयवादावरुन तुंबळ शाब्दिक बाचाबाची झाली. दोन्हीकडील समर्थक आक्रमक झाले आणि हा वाद इतका वाढला की, खासदार रेखा वर्मा यांनी आमदारावर थेट चप्पलच उगारली.
त्यानंतर दोन्हीकडील समर्थकांमध्ये धक्काबुक्कीही झाली. काहींनी तर टेबलही फेकले. खासदार आणि आमदारांचे समर्थक हातापायवरही आले आणि प्रकार मारहाणीपर्यंत पोहाचला.
सीतापूरमधील महोली तालुक्यात गरिबांना ब्लँकेटचं वाटप करण्यात येत होतं. आमदार शशांक त्रिवेदी यांनी ब्लँकेट वाटपाच्या श्रेयावरुन वाद घातला.
पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी या सर्व प्रकारात हस्तक्षेप करत सर्वांना शांत केले. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपच्या खासदार आणि आमदारांनी सारवासारव करण्यास सुरुवात केली.
ब्लँकेट वाटपाच्या श्रेयावरुन भाजपचे आमदार-खासदार भिडले!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jan 2018 10:14 AM (IST)
सीतापूरमधील महोली तालुक्यात गरिबांना ब्लँकेटचं वाटप करण्यात येत होतं. आमदार शशांक त्रिवेदी यांनी ब्लँकेट वाटपाच्या श्रेयावरुन वाद घातला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -