मुंबई : मुस्लीम धर्मगुरु डॉ. झाकीर नाईक आज भारतात परतणार नाही. डॉ. नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनने याबाबतची माहिती दिली आहे. अटकेच्या भीतीने डॉ. झाकीर नाईकने भारतात येणं तूर्तास टाळल्याची चर्चा आहे.


डॉ. झाकीर नाईकला आज अटक?


डॉ. झाकीर नाईक आज सौदी अरेबियामधून भारतात परतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्याची बाजू मांडणार होता. मात्र सध्या त्याची भारत वापसी रद्द झाली आहे.


 

बांग्लादेशमध्ये झाकीर नाईकच्या पीस टीव्हीवर बंदी


 

बांग्लादेशातील एका हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी तरुण डॉ. झाकीर नाईकच्या भाषणाने प्रेरित झाल्याचे बोललं जात आहे. याबाबत डॉ. झाकीर नाईकला विचारणा करण्यात आली. त्यावर उत्तर देताना माझे चाहते जगभरात आहेत, असं डॉ. नाईक म्हणाला होता. त्यानंतर नाईकवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

 

डॉ. झाकीर नाईकांची भाषणं आक्षेपार्ह, आयबीचा दीड वर्षांपूर्वीच अहवाल


 

मुस्लीम धर्म वगळता इतर धर्मांबद्दल नाईकने आक्षेपार्ह विधानं केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. राज्य सरकार झाकीरच्या भाषणांची तपासणी करत आहे.


झाकीर नाईकविरोधातील फतव्याचा चुकीचा वापर, दार-उल-उलूम देवबंद नाराज


 

तसंच बांगलादेशमध्ये झाकीर नाईकच्या पीसी टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे. आता भारतातही डॉ. नाईकच्या पीस टीव्हीवर बंदी घालण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. इतकंच नाही तर आणखी पाच देशांमध्ये नाईकवर बंदी आहे.