डॉ. झाकीर नाईकला आज अटक?
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2016 02:32 AM (IST)
मुंबई : मुस्लीम धर्मगुरु डॉ. झाकीर नाईक आज भारतात परतण्याची शक्यता आहे. प्रक्षोभक भाषणांविरोधात मुंबई पोलिस डॉ. नाईकविरोधात अटकेची कारवाई करण्याची शक्यता आहे. बांग्लादेशातील एका हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी तरुण डॉ. झाकीर नाईकच्या भाषणाने प्रेरित झाल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर नाईकवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसंच बांगलादेशमध्ये झाकीर नाईकच्या पीसी टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे.