Congress Press Conference On Rahul Gandhis Disqualification : ''राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई हा राजकीय मुद्दा आहे. राहुल गांधी सातत्याने देशातील विविध मुद्द्यांवर आवाज उचलत आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या कारवाईने होत आहे'', अशी टीका काँग्रेसने नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या एका निर्णयाचे अनेक राजकीय अर्थ निघत आहेत. आता याच मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेत केंद्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. याच पत्रकार परिषदेत अभिषेक मनु सिंघवी असं म्हणाले आहेत. देशातील ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी राहुल गांधींवर ही कारवाई करण्यात आल्याचं ते म्हणाले आहेत.


Congress Press Conference On Rahul Gandhis Disqualification : 'राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न'


काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, ''राहुल गांधी (Rahul Gandhis Disqualification) बेधडक बोलत आहेत. ते सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयांवर सातत्याने बोलत आहेत.मग तो नोटाबंदीचा मुद्दा असो, चीनचा असो किंवा जीएसटी असो, त्यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकार हे सर्व करत आहे.''


माध्यमांशी बोलताना अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, ''कलम 103 अंतर्गत सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रपतींनी घ्यायला हवा होता. तिथेही राष्ट्रपती आधी निवडणूक आयोगाकडून सूचना घेतात, त्यानंतर निर्णय घेतला जातो. मात्र या प्रकरणात ही प्रक्रिया पाळली गेली नाही.'' शिक्षेला स्थगिती मिळेल, असा विश्वास अभिषेक मनू सिंघवी यांनी व्यक्त केला आहे.






दरम्यान, मोदी आडनावाचे सर्वजण चोर कसे असतात? कर्नाटकच्या कोलारमध्ये असे वक्तव्य राहुल गांधीनी प्रचारादरम्यान केलं होतं. त्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhis Disqualification) यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काल (23 मार्च) त्यासंदर्भात सूरतच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. राहुल गांधींनी जामीनासाठी अर्ज केला. राहुल गांधीचा जामीनही मंजूर झाला आहे. मात्र, या शिक्षेची अंमलबजावणी 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली. तसेच उच्च न्यायालयात जाण्यासाठी कोर्टाने राहुल गांधींना 30 दिवसांचा वेळ दिला आहे. त्यानंतर आज लोकसभा सचिवालयाने मोठी कारवाई करत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.