नवी दिल्ली : देशाच्या सर्वोच्च न्यायालातील न्यायमूर्तींनी आज पत्रकार परिषद घेऊन, कोर्टाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर; सर्वच स्तरातून या प्रकरणावर प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही यावर प्रतिक्रिया देताना, देशातील लोकशाही धोक्यात असल्याचं म्हटलं आहे.


याशिवाय, राहुल गांधींनी न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी वरिष्ठ न्यायमूर्तींकडून करण्याची मागणी राहुल गांधींनी केली आहे. शिवाय, आपला न्यायपालिकेवर विश्वास असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

तर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी, न्यायमूर्तींच्या या पत्रकार परिषदेचा दूरगामी परिणाम होणार असल्याचं सांगत, माननीय न्यायमूर्तींची टीप्पणी सर्वांचीच चिंता वाढवणारी असल्यांचं म्हटलं आहे.

दरम्यान, न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या घरी संध्याकाळी उशिरा एक बैठक झाली. या बैठकीत माजी कायदेमंत्री सलमान खुर्शीद, कपिल सिब्बल, पी.चिदंबरम्, अहमद पटेल, मोतीलाल बोरा, मनीष तिवारी, काँग्रेसच्या लीगल सेलचे हेड विवेक तन्खा आणि काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला सहभागी झाले होते.

या प्रकरणावर सुरुवातीला प्रतिक्रिया देताना, काँग्रेसने हा विषय अतिशय गंभीर असल्याचे सांगितलं. न्यायमूर्तींना पत्रकार परिषद घेऊन तक्रार करावी लागणं, अतिशय दुर्दैवी असल्याचं मत वरिष्ठ काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी मांडलं. तर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवींनी न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन काहीही चुकीचं केलं नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणावरुन सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्यांशी बातचीत करुन, या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आङे. तसेच, या प्रकरणी न्यायमूर्तींनी चर्चेतूनच तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

या एका केसमुळे न्यायमूर्तींच्या असंतोषाचा कडेलोट झाला

सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता

सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत?

सरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील

न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे?

सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधानांची कायदेमंत्र्यांशी चर्चा

न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे?

सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत?

सोहराबुद्दीन प्रकरणातील जजच्या मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

PHOTO : न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेतील 6 महत्त्वाचे मुद्दे