नवी दिल्ली : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत बाजारु असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केल्यानंतर 'व्हिडिओवॉर' रंगला आहे. लोकसभेत काँग्रेस-भाजपमध्ये राफेलवरुन सुरु असलेलं वाकयुद्ध, आता संसदेबाहेरही सुरु आहे. 'एनआय' वृत्तसंस्थेच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी एक जानेवारी रोजी मोदींची प्रकट मुलाखत घेतली होती


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत राफेल डीलच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला होता. त्यावेळी बोलताना, 'त्यांच्यामध्ये (मोदी) तुम्हा पत्रकारांसमोर येऊन बसण्याची हिंमत नाही. पण मी आलो आहे. तुम्ही मला कोणतेही प्रश्न विचारु शकता. तुम्ही पंतप्रधानांची मुलाखत पाहिलीत का? म्हणजे प्लाएबल (Pliable) पत्रकार. त्या प्रश्नही विचारत होत्या आणि उत्तरंही देत होत्या' असं राहुल गांधी म्हणाले.

प्लाएबल हा शब्द नेहमीच्या वापरातील नसल्यामुळे अनेकांना गूगलचा आधार घ्यावा लागला. त्याचा शब्दशः अर्थ सहज कोणाच्याही प्रभावाखाली येणारा असा येतो. राहुल गांधींचा हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर वायरल झाला. त्यानंतर राहुल गांधींनी उच्चारलेला #Pliable हा शब्द ट्रेण्डिंगमध्ये आला.


'द एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया' अर्थात भारतातील वरिष्ठ संपादकांच्या मंडळाने याविषयी काळजी व्यक्त केली आहे. पत्रकार किंवा प्रसारमाध्यमांना टार्गेट करणं हा बदनामीचा सोपा मार्ग असल्याचं मत माध्यम क्षेत्रातून व्यक्त केलं जात आहे.

'आणीबाणीच्या हुकूमशाहाच्या नातवाने आपली खरी गुणसूत्रं (डीएनए) दाखवली. एका संपादकावर हल्ला चढवून घाबरवलं' अशा आशयाचं ट्वीट केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे.


पंतप्रधान मोदींच्या मुलाखती एकत्र करुन त्यांचा व्हिडिओ काँग्रेसने पोस्ट केला. प्लाएबल हा आक्षेपार्ह शब्द नाही, ही भारतीय पत्रकारितेची सद्यस्थिती आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे.


भाजपच्या अमित मालवीय यांनी काही वेळातच राहुल गांधी, सोनिया गांधी आणि अखिलेश यादव यांच्या मुलाखतींचा भाग असलेला एक व्हिडिओ शेअर केला.


ही टीका ज्यांच्यावर करण्यात आली, त्या एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनीही मौन सोडलं आहे. 'तुम्हाला पंतप्रधानांवर टीका करायची आहे, जरुर करा, '

राहुल गांधींनी केलेल्या टीकेचा प्रेस क्लब ऑफ इंडियाकडूनही समाचार घेण्यात आला. 'आधी केंद्रीय मंत्र्याने वापरलेला प्रेस्टिट्यूट हा शब्द आणि त्यानंतर एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षाने मीडियाला प्लाएबल म्हणणं हे अनुचित आहे' असं पीसीआयने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.