नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळच्या थिरुवनंतपुरचे खासदार शशी थरुर कायम आपल्या बिनधास्त विधानं आणि ट्वीटमुळे चर्चेत असतात. पण त्यांचं फॅन फॉलोईंग तुफान आहे. आता लग्नाच्या एका प्रस्तावामुळे शशी थरुर पुन्हा चर्चेत आले आहेत. हा प्रस्ताव तरुणीने नाही तर एका समलैंगिक तरुणाने ठेवला आहे.
दिल्लीत 13 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या एलजीबीटी कम्युनिटीच्या दहाव्या क्वीर प्राईड परेडमध्ये एका तरुणाने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. या तरुणाच्या हातात एक फलक होतं, ज्यावर "शशी थरुर मॅरी मी" अर्थात "शशी थरुर माझ्याशी लग्न करा," असं लिहिलं होतं.
https://twitter.com/GaylaxyMagazine/status/929742679834898432
यानंतर गेलेक्सी मॅग्झिन नावाच्या ट्विटर हॅण्डलवर तरुणाचा फोटो शेअर करुन शशी थरुर यांना मेंशन केलं. शशी थरुर तुम्ही हे नक्की पाहा. तुमचं फॅन फालोईंग खूप आहे, असं या ट्वीटमध्ये लिहिलं होतं.
यावर शशी थरुर यांनी दिलेलं उत्तर फारच रंजक होतं. त्यांच्या उत्तराने अनेकांची मनं जिंकली. थरुर यांनी ट्वीट केलं की, हाहा...जर ते थिरुवनंतपुरमचे अधिकृत मतदार असते आणि आणखी चांगलं झालं असतं.
https://twitter.com/ShashiTharoor/status/930035122224746498
ट्विटर युझर्सना शशी थरुर यांचं उत्तर एवढं आवडलं की, तुम्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार बना, देशाला तुमच्यासारख्या सुशिक्षित व्यक्तींची गरज आहे, असं म्हटलं.
https://twitter.com/ghumakkarladka/status/930041912345497600
https://twitter.com/adimendiratta/status/930391933855334400
https://twitter.com/SubhamG94897497/status/930146899557883904
https://twitter.com/KishanderIsabel/status/930049566283460608
दरम्यान, मार्च 2016 मध्ये शशी थरुर यांनी समलैंगिकतेला गुन्ह्याच्या श्रेणीत वगळण्यासाठी लोकसभेत खासगी सदस्य विधेयक सादर केलं होतं. परंतु विरोधात मतदान झाल्याने ते विधेयक मंजूर झालं नाही. या विधेयकाद्वारे शशी थरुर यांनी संविधानाच्या कलम 377 मध्ये दुरुस्तीची मागणी केली आहे. कलम 377 अंतर्गत भारतात समलैंगिकता हा गुन्ह्याच्या श्रेणीत येते.