नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी बोलवलेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. या बैठकीत शेतकरी कायदे, केंद्र आणि राज्यातील समन्वय यावर चर्चा होणार आहे. मात्र आम आदमी पार्टी आणि अकाली दल यांना या बैठकीचं निमंत्रण नसल्याचं सांगण्यात येत आहे.
देशातील मुख्य विरोधी पक्षाच्या नेत्यांची ही बैठक होणार असून जे पक्ष राज्य स्तरावर विरोधी पक्षात काम करत आहेत त्या मुख्यमंत्र्यांची आज बैठक आहे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत त्यापैकी पॅगसेस, महागाई यासारख्या अनेक विषयावर चर्चा होणार आहे ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, झारखंड,केरळ ,छत्तीसगढ चे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. देशात मोदी सरकारकडून 2024 लोकसभा निवडणुकीची व्युहरचना आणि पर्यायी नेतृत्व यासह अनेक विषयांवर या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह देशातील विरोधी पक्षाची भूमिका बजावणारे अनेक नेते सहभागी होणार आहेत.