तिरुअनंतपुरम : काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. थरुर यांनी मात्र फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या वृत्ताचं खंडन केलं आहे.


'माझी मतं आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा जुळत नाही. गेल्या चाळीसहून जास्त वर्षांपासून मी प्रत्येक नागरिक समाजाच्या समान हक्कांविषयी बोलत आलो आहे. त्याच्याशी तडजोड शक्य नाही.' असं स्पष्टीकरण थरुर यांनी दिलं आहे.

'मी भाजपप्रवेश करणार असल्याच्या अफवा अनेकदा उठत असतात. मी निक्षून सांगतो, त्या तथ्यहीन आहेत.' असंही थरुर म्हणाले. केरळ माकपचे सचिव कोडियेरी बालक्रिश्नन यांनी चार काँग्रेस नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. या चौघांमध्ये शशी थरुर यांचा समावेश असल्याचं त्यांनी म्हटल्यानंतर थरुर यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.

काहीच दिवसांपूर्वी 36 वर्ष काँग्रेसमध्ये असलेले माजी परराष्ट्र मंत्री एस एम कृष्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

थरुर यांची फेसबुक पोस्ट :