नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशाला सांगावं की चीनच्या सैन्याना भारतातून मागे कधी आणि कसं पाठवणार? देशात न्याय योजना लागू करण्याचा आणि गरीब नागरिकांना खात्यात साडेसात हजार रुपये देण्याचा सल्ला दिला. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाआधी राहुल गांधींचा सरकारला सल्ला; चीनबाबत सवाल उपस्थित
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jun 2020 04:00 PM (IST)
देशात न्याय योजना लागू करण्याचा आणि गरीब नागरिकांना खात्यात साडेसात हजार रुपये देण्याचा सल्ला राहुल गांधी यांनी दिला. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -