नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या शेतकर्यांचे आंदोलन दिल्ली येथे पोहोचले आहे. यापूर्वी हरियाणात शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. अनेक शेतकर्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आमच्यासाठी जय किसान होता आणि राहील, असे ट्विट राहुल गांधी यांनी करत मोदी सरकारचा निषेध केला आहे.
केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांकडून जोरदार आंदोलने सुरु आहेत. सिंधूच्या सीमेवर शेतकर्यांनी रात्र काढली अजूनही तिथेच आहेत. आता त्यांनी सिंधूच्या सीमेवरुन माघार घेणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांनी प्रवाश्यांसाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे. सिंधू सीमा दोन्ही बाजूंनी बंद असून पर्यायी मार्ग निवडण्यास दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.
शेतकर्यांचे आंदोलन रोखण्यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न केला गेला जात आहे, त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. राहुल गांधी यांनी एका ट्विटमध्ये मोदी सरकारच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या निर्णयावर टीका केली आहे.
राहुल गांधी म्हणाले, 'न्यायाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा नाही, कर्तव्य आहे. मोदी सरकार पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करुन शेतकऱ्यांना थांबवू शकत नाही. हा लढा कृषीविरोधी काळा कायदा संपेपर्यंत चालूच राहील, आमच्यासाठी 'जय किसान' होता आणि असेल '