Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आज लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे.  त्यानंतर कोर्टाच्या निर्णायची प्रत आणि अन्य कागदपत्र काँग्रेसनं तातडीनं लोकसभा सचिवालयाकडे सुपूर्द केले होते. आज सकाळी लोकसभा सचिवालयाची बैठक झाली, ज्यामध्ये यााबबत अधिसूचना जारी करण्यात आली. राहुल गांधींना खासदारकी बहाल झाल्यामुळे राहुल गांधींना उर्वरीत अधिवेशनात सहभागी होता येणार आहे.

  


सुप्रीम कोर्टानं (Suprme Court) राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती  दिली  त्यानंतर  त्यांची खासदारकी पुन्हा बहाल कधी होणार? याची राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर आज राहुल गांधींना लोकसभेच्या सचिवालयकडून खासदारकी बहाल करण्यात आली आहे. 8 ऑगस्ट..म्हणजे उद्या संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. 2014 नंतर मोदी सरकारच्या विरोधातला हा दुसरा अविश्वास प्रस्ताव आहे. खासदारकी मिळाल्यानंतर राहुल गांधी या चर्चेत राहुल गांधी सहभागी होणार आहे.






मोदी सरकारच्या विरोधात मागचा अविश्वास प्रस्ताव आला होता. त्यावेळी भाषणानंतर राहुल गांधींनी मारलेली मिठी चांगलीच गाजली होती. आता यावेळी अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत राहुल गांधी नसणार अशी चर्चा सुरु असतानाच सुप्रीम कोर्टाच्या निकालानं ती संधी उपलब्ध करुन दिलीय.  त्याआधीच सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना ही संधी पुन्हा दिली आहे.  अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत भाग घेतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष


राहुल गांधींना लोकसभेचे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. या निर्णयाचा आनंद देशभरातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी साजरा केला. दिल्लीत काँग्रेसच्या वतीनं फटाके आतषबाजी करून आणि एकमेकांना मिठाई भरवून सेलिब्रेशन करण्यात आलं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल-ताशा वाजवत एकच जल्लोष केला.मुंबईतही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात मोठा जल्लोष केला. 


राहुल गांधी परत संसदेत दिसणार 


मोदी आडनावावरुन टीकेच्या प्रकरणी 23 मार्च रोजी सूरत कोर्टाचा निकाल आला, त्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत लोकसभा सचिवालयानं नियमाप्रमाणे त्यांची खासदारकी रद्द केली होती. सूरत सत्र न्यायालय, सूरत जिल्हा न्यायालय, अहमदाबाद हायकोर्ट या गुजरातच्या तीन कोर्टांनी राहुल गांधींची शिक्षा कायम ठेवलेली होती. पण अखेर जवळपास चार महिन्यांनी राहुल गांधींना दिलासा मिळाला आहे.


हे ही वाचा :


Rahul Gandhi : दोन वर्षाची शिक्षा, खासदारकी गेली... आता निर्णयाला स्थगिती; राहुल गांधींच्या खटल्याची क्रोनोलॉजी जाणून घ्या