Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत न्यायालयाने (Surat Session Court) जामीन मंजूर केला आहे. मोदी आडनावाबाबत राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकणी त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. आता प्रकरणी न्यायालयानं राहुल गांधींना जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, आता पुढील सुनावणी 13 एप्रिल रोजी होणार आहे. राहुल गांधी यांनी सुरत कोर्टात मोदी आडनावावरुन झालेल्या शिक्षेविरोधात सोमवारी सुरत सत्र न्यायालयात याचिका दाखल आहे. 


शिक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिकेवर 3 मे रोजी सुनावणी


दरम्यान, शिक्षा स्थगितीच्या याचिकेवर आता पुढील सुनावणी 13 एप्रिल रोजी होणार आहे. राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत 2019 साली केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांना सुरत न्यायालयानं दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. तर या प्रकरणी दोषी असण्याचा निर्णय रद्द करण्यासंदर्भातील याचिकेवर 3 मे रोजी सुनावणी होणार आहे. सुरत कोर्टात राहुल गांधी यांनी दोन याचिका दाखल केल्या होत्या. त्यापैकी एक याचिका जामीनाबाबत होती. तर दुसरी याचिका दोषी असण्याला आव्हान देण्याबाबत होती. त्यानुसार 3 मे रोजी सुनावणी होणाऱ्या याचिकेत जर दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती मिळाली तरच राहुल गांधींच्या खासदारकी बाबत निर्णय होईल.


सुरत सत्र न्यायालयाने आज दोषी असण्याच्या निर्णयाला स्थगिती दिलेली नाही, मात्र राहुल गांधी यांचा अर्ज दाखल करुन घेत, या प्रकरणी मूळ याचिका दाखल करणाऱ्या पूर्णेश मोदी यांनाही नोटीस जारी केली आहे. पूर्णेश मोदी यांनी या नोटिसीला 10 एप्रिलपर्यंत उत्तर द्यायचं आहे. राहुल गांधी यांना आज मिळालेला जामीन, आज त्यांनी दाखल केलेल्या अपीलावर निर्णय होईस्तोवर कायम असणार आहे. यापूर्वी शिक्षा सुनावताना सुरतच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी स्वतःच सुनावलेल्या शिक्षेला एक महिन्याची स्थगिती देत, एक महिन्याचा जामीनही राहुल गांधी यांना दिला होता.  


23 मार्चला सूरत कोर्टानं राहुल गांधींनी दोषी ठरवलं होतं


मोदी आडनाव प्रकरणात 23 मार्चला सुरतच्या कोर्टानं राहुल गांधी यांना दोषी ठरवलं होते. त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आलं. या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी न्यायालयानं राहुल गांधींना 30 दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार, आज शिक्षा सुनावल्यानंतर तब्बल 11 दिवसांनी राहुल गांधी न्यायालयात याचिका दाखल केली. मोदी आडनावावरील वक्तव्यासंदर्भात झालेल्या राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्यामुळे राहुल गांधींची खासदारकी रद्द  करण्यात आली आहे. दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास अपात्रतेची कारवाई रद्द होण्याची ही शक्यता आहे. त्यामुळं राहुल गांधींनी सेशन कोर्टात याचिका दाखल केली.  


गुजरातमधील आमदारानं राहुल गांधी विरोधात केला होता मानहानीचा खटला 


2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलारमध्ये मोदी आडनावाबाबत वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण मोदी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप राहुल गांधी यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर गुजरातमधील भाजप आमदारानं राहुल गांधी यांच्याविरोधात सुरत कोर्टात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्याच्या विरोधात, न्यायालयानं राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती.


महत्त्वाच्या बातम्या:


Rahul Gandhi Disqualified: सुरत कोर्टाच्या निर्णयाविरोधात आज राहुल गांधी याचिका दाखल करणार; तातडीनं सुनावणी होणार?