यूपीए सरकार (UPA government) असताना भारताचे नेतृत्व देशाचे पंतप्रधान करत होते, पण आजच्या भारताचे नेतृत्व एका राजाने केले आहे, जो फक्त निर्णय घेतो आणि कोणाचेही ऐकत नाही असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी (rahul gandhi)केलंय. यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi)यांच्यावर निशाणा साधला. मोदी सरकारने कोविड-19 महामारीत (covid-19) शेतकऱ्यांना अक्षरश: रस्त्यावर सोडल्याचा आरोप केला. तसेच कॉंग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत असे कधीच करणार नाही असे सांगितले. आगामी उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी किच्छा येथे एका डिजिटल रॅलीला संबोधित करताना राहूल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
मनमोहन सिंग यांचा काळ 'गोल्डन पीरियड'
राहुल गांधी पुढे म्हणाले, मनमोहन सिंग यांचा काळ 'गोल्डन पीरियड' होता. तो सुवर्णकाळ होता, कारण त्यावेळी शेतकरी आणि सरकार यांच्यात भागीदारी होती. त्यावेळी सरकारचे दरवाजे तुमच्यासाठी उघडायचे, ते बंद होत नव्हते. कामगार नेहमी त्यांचे म्हणणे सांगायचे. त्यावेळी भारतात एक पंतप्रधान होता आणि आजच्या भारतात एक राजा आहे. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांनी सर्वांसाठी काम केले पाहिजे, लोकांचे ऐकले पाहिजे. नरेंद्र मोदीजी हे पंतप्रधान नाहीत, तर राजा आहेत. त्यांनी जवळपास वर्षभर शेतकर्यांकडे दुर्लक्ष केले, कारण राजा केवळ मजुरांचे म्हणणे ऐकून घेत नाही, तर तो स्वत: त्यांच्यासाठी निर्णय घेतो.
उत्तराखंड विधानसभेसाठी 14 फेब्रुवारीला मतदान
राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस शेतकरी, तरुण, मजूर किंवा गरीबांसाठी आपले दरवाजे कधीही बंद करणार नाही, आम्हाला त्यांच्यासोबत भागीदारी करायची आहे. आम्ही राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाबमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आणि ते आम्ही पूर्ण केले. 70 सदस्यीय उत्तराखंड विधानसभेसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.