मुंबई : देशातील वाढत्या महागाईवरून काँग्रेस नेते राहुल गांधी  (Rahul Gandhi)  यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. अमृतमोत्सवाच्या जल्लोषात मग्न असणाऱ्या भाजप सरकारने देशात महागाई नाही, असे सभागृहात सांगितले. परंतु,  त्यांना महागाई कशी दिसेल? कारण त्यांनी डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधली असून देशाची संपत्ती 'फ्री फंडा'मध्ये 'मित्रांना' विकत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केंद्रावर केली. 


राहुल गांधी यांनी वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारला लक्ष्य करताना 2019 पासून देशात किती टक्के महागाई वाढली याची आकडेवारीच दिली आहे. ट्विट करत राहुल गांधी यांनी केंद्रावर हल्लाबोल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी देशातील वाढत्या महागाईवरून केंद्राला सतत लक्ष्य केलंय. 






राहुल गांधी यांनी यापूर्वी देखील एक ट्विट करून आकडेवारी देत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. देशातील जनता नाराज आहे, मात्र ‘अहंकारी राजा’ची प्रतिमेसाठी सरकार कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत आहे. हुकूमशाही सरकारला वाडते की त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. परंतु, तसे होणरा नाही. कारण काँग्रेस त्याविरोधात लढत आहे आणि लढत राहिल. "स्वतःला एकटे समजू नका, काँग्रेस हा तुमचा आवाज आहे आणि तुम्ही काँग्रेसची शक्ती आहात. हुकूमशहाच्या जनतेचा आवाज दाबण्याच्या प्रत्येक प्रयत्नाशी आपल्याला लढावे लागेल. तुमच्यासाठी मी आणि काँग्रेस पक्ष लढत आलो आहे आणि यापुढेही लढणार आहोत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 


 









वाढत्या महागाईवरून देशभरात काँग्रेसकडून ठिकठिकाणी आंदलनने केली जात आहे. शिवाय काल लोकसभेत देखील विरोधकांकडून वाढत्या महागाईबाबात केंद्र सरकारला घेण्याचा प्रयत्न केला.