Gold Rate Today : श्रावण महिन्यात सणवारांसाठी दागिने खरेदीची लगबग असते. या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. सलग दोन दिवस सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.25 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,410 रूपयांवर आला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 58,020 रूपये आहे. तुमच्या शहरातील आजचे सोने-चांदीचे काय आहेत ते जाणून घ्या.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर :
शहर | सोने (24 कॅरेट) | 1 किलो चांदीचा दर |
मुंबई | 51,320 | 57,900 |
पुणे | 51,320 | 57,840 |
नाशिक | 51,320 | 57,840 |
चेन्नई | 51,470 | 58,070 |
दिल्ली | 51,230 | 57,800 |
कोलकाता | 51,250 | 57,820 |
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या