Congress G-23 : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्षातील G-23 नेत्यांची पक्षात सक्रियता वाढली आहे. या G-23 गटातील नेते कमलनाथ यांनी मोठा दावा केला आहे. G-23 गटाच्या सूचना मान्य करण्यात आल्याचे काँग्रेस नेते कमलनाथ यांनी सांगितले. येत्या तीन महिन्यात पक्षात मोठे बदल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  


काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या असंतोषाबाबत कमलनाथ यांनी सांगितले की, G-23 च्या सर्व सूचना मान्य केल्या आहेत. पक्षातील सर्व लोक आमचे सहकारी, मित्र आहेत. येत्या तीन महिन्यात तुम्हाला मोठा बदल दिसून येईल असेही त्यांनी सांगितले. 


महागाईच्या मुद्यावर काँग्रेसने आज आंदोलन केले. या आंदोलनानंतर कमलनाथ यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशच्या निवडणुका होईपर्यंत  इंधन दर स्थिर ठेवण्यात आले होते. निवडणूक निकालानंतर इंधन दरात वाढ सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. कायम निवडणुकीच्या तयारीत  भाजप असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेस नेहमी जनतेसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. 


नेतृत्व बदलाच्या मागणीवर G-23चा सूर मवाळ


काँग्रेसच्या 'G-23' गटात समाविष्ट असलेल्या नेत्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसमधील सक्रिय अध्यक्ष आणि संघटनेत मोठ्या प्रमाणावर बदल करण्याची मागणी केली होती. निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या कार्यकारणी समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जी-23 गटाचे समाधान झाले नाही. काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधींनी G-23 चे सदस्य गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली. या बैठकीनंतर सर्व वाद मिटल्यासारखे वाटत होते. त्याचवेळी G-23 मध्ये सहभागी असलेले कपिल सिब्बल यांनीही थेट राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha