बीफ करी ही केरळच्या आहारातील महत्वाचा घटक आहे, हे मला माहिती आहे. मात्र, शाकाहारी आहार मांसाहारापेक्षा कमी कार्बन सोडतो, याबद्दल माझ्या मनात शंका नसल्याचे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, 2009 ज्यावेळी मी पर्यावरण मंत्री होता, त्यावेळी एका आंतरराष्ट्रीय संमेलनात भारतीय लोकांनी गोमांस खाऊ नये, असं आवाहन केलं होते. माझ्या या भूमिकेचं विश्व हिंदू परिषदेने स्वागत केलं होतं. पहिल्यांदाच असं घडलं की व्हीएचपीने माझं समर्थन केलं. सध्या ग्लोबल वॉर्मिंगवर जगभर चर्चा सुरू आहे. कार्बनच्या उत्सर्जनात दिवसेंदिवस होणाऱ्या वाढीमुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे.
नागरिकत्व दुरस्ती कायद्याबद्दल ज्यांना शंका आहे, त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार : अमित शाह
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवातून शिकावं -
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवावर जयराम रमेश यांनी चिंता व्यक्त केली. पक्षात फेरबदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. तर, काँग्रेसचे एक वरिष्ठ नेता वीरप्पा मोइली म्हणाले, की पक्षाला अंतर्गत 'सर्जिकल स्ट्राइक' करण्याची गरज आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सत्ता कायम राखत 63 जागा जिंकल्या आहेत. तर, भाजपने सात जागांवर विजय मिळवला. दरम्यान, ज्या काँग्रेस पक्षाने दिल्लीवर 25 वर्ष सलग सत्ता केली. त्यांचा सलग दुसऱ्या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला खातेही उघडता आलं नाही.
कोण आहेत जयराम रमेश?
जयराम रशेम हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते मूळचे कर्नाटकातील चिकमंगळूर या ठिकाणचे आहेत. सध्या ते 2016 पासून राज्यसभेचे खासदार आहेत. मनमोहन सिंग सरकारच्या काळात ते केंद्रात मंत्री होते.
VIDEO | मेट्रो कारशेड झाल्यास पर्यावरणाला धोका : जयराम रमेश | एबीपी माझा