बंगळुरु : काँग्रेसचे स्थानिक नेते सी.के. रविचंद्रन हे बंगळुरु प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री एम.सिद्दारामय्या यांच्याविरोधात खटला चालवण्यास परवानगी दिल्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसकडून या निर्णयाचा विरोध करण्यात येत आहे. या आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत सी.के. रविचंद्रन बोलत होते. पत्रकारांना संबोधित करत असताना रविचंद्रन यांना ह्रदयविकाराचा धक्का आला, यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. 


काँग्रेस नेते बंगळुरु प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. यावेळी सी.के. रविचंद्रन माध्यमांना राज्यपालांच्या निर्णयाविरोधातील काँग्रेसच्या आंदोलनाची माहिती देत होते. रविचंद्रन हे कोलार जिल्ह्यातील कुरुबरा संघाचे अध्यक्ष होते. ते माध्यमांशी बोलत होते.यावेळी त्यांना अचानक ह्रदयविकाराचा धक्का बसला. बोलता बोलता ते थोडावेश शांत झाले अन् खूर्चीवरुन समोरच्या बाजूला खाली कोसळले. पत्रकार परिषदेत तांच्यासोबत बसलेल्यांना काही कळायच्या आता त्यांचा मृत्यू झाला. 
 
दरम्यान, सी. के. रविचंद्रन यांच्या निधनाचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं. पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या इतर नेत्यांनी त्यांना फोर्टिस रुग्णालयात  दाखल केलं. मात्र, तिथं रविचंद्रन यांची तपासणी करुन मृत जाहीर करण्यात आलं. 


या घटनेचा व्हिडीओ व्हायरल


काँग्रेस नेते सी. के. रविचंद्रन यांचं निधन झालं तेव्हा पत्रकार परिषद सुरु होती. त्यामुळं हा सर्व घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ह्रदयविकाराच्या घटनांमुळं वाढलेल्या मृत्यूच्या संख्येमुळं अनेकांनी चिंता देखील व्यक्त केली आहे. 


 
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिदारामय्या यांनी सी.के. रविचंद्रन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. संविधान आणि लोकशाहीला वाचवण्याच्या लढाईतील आमचा साथीदार सी.के. रविचंद्रन याच्या मृत्यूची बातमी वेदनादायी असून यामुळं दु:ख झालं. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना करतो, असं सिदारामय्या म्हणाले. 



म्हैसूर जमीन घोटाळा प्रकरणात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिदारामय्या यांची चौकशी करण्यास परवानगी दिली होती. यानंतर काँग्रेस आक्रमक झाली होती. सिदारमय्या यांना या प्रकरणात दिलासा मिळाला असून 29 ऑगस्टपर्यंत पोलिसांनी कारवाई करु नये, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत.






इतर बातम्या :


चिराग पासवान लॅटरल एंट्री भरती प्रक्रियेच्या विरोधात मैदानात,म्हणाले आरक्षणाच्या तरतुदींचं पालन झालंच पाहिजे...


Mpox : सावधान! मंकीपॉक्स हळूहळू पसरतोय..WHO कडून 'हेल्थ इमरजेंसीची' घोषणा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या