नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार बूटा सिंह यांचे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या 86 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुटा सिंग गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. पंजाबच्या जालंधरमधील मुस्तफापूर गावात जन्मलेले बूटा सिंग 8 वेळा लोकसभेचे खासदार होते. पंजाबमधील प्रमुख दलित नेता म्हणून त्यांची ओळख झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.


राजीव गांधी पंतप्रधान असताना वर्ष 1986 ते 1989 पर्यंत राजीव गांधी सरकारमध्ये ते केंद्रीय गृहमंत्री होते. याआधी त्यांनी राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये 1984 ते 1986 पर्यंत त्यांनी कृषिमंत्री म्हणून कारभार पाहिला. याशिवाय 2004 ते 2006 पर्यंत बूटा सिंग बिहारचे राज्यपाल देखील होते. 2007 ते 2010 या काळात त्यांनी मनमोहनसिंग सरकारच्या कार्यकाळात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली.





पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुटा सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान म्हणाले, 'बूटासिंग हे एक अनुभवी प्रशासक आणि गरीब व दलितांच्या हितासाठी प्रभावी आवाज होते. त्यांच्या निधनाने मी दु: खी आहे. मी त्यांचे कुटुंब आणि समर्थकांप्रती शोक व्यक्त करतो.





कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, 'सरदार बूटासिंग जी यांच्या निधनानंतर देशाने खरा लोकसेवक व निष्ठावान नेता गमावला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या सेवेसाठी आणि लोकहितासाठी समर्पित केले, त्यासाठी त्यांचे कायम स्मरण राहील. या कठीण काळात मी त्याच्या कुटुंबातील सदस्यांप्रती शोक व्यक्त करतो.