पणजी : मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी एक दिवस अगोदर काँग्रेसने त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर उद्या (मंगळवार) सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे.


गोवा विधानसभेत काँग्रेसला 17, भाजपला 13, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड पक्षाला 3, अपक्षांना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली होती.

काँग्रेस मोठा पक्ष ठरला असला तरी मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या अटीवर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि 2 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजप आणि इतर पक्षांचे मिळून एकूण 21 आमदारांनी राज्यपालांसमोर सत्ता स्थापनेचा दावा केला.

गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं आहे. तसंच बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी दिला आहे.

संबंधित बातम्या

पर्रिकरांचा राजीनामा, अरुण जेटली पुन्हा संरक्षण मंत्री!


गोव्यात भाजपला पाठिंबा देणाऱ्या पक्षांना मंत्रिपदं : सूत्र


गोव्यात शिवसेनेचा दारुण पराभव, तीन उमेदवारांना एकूण 792 मतं


भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड कमावलं, गोवा मात्र गमावलं


गोव्यात मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सहा मंत्र्यांचा पराभव