प्रिया दत्त यांनी आपल्या ट्विटमध्ये, ''काँग्रेस आजारी आहे, वारंवार आजारी पडतेय, पण त्या रोगांचा इलाजही काँग्रेसमध्येच आहे, काँग्रेसचा आजारही काँग्रेस मध्येच आहे तसंच इलाजही काँग्रेसमध्येच आहे,'' असं म्हणलं आहे.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मोठी वाताहत झाली असून, पाचपैकी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. तर गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये काँग्रेसने कडवी झुंज देऊनही सत्ता स्थापन करण्यात पक्षाला यश मिळालं नाही.
दरम्यान, यावरुन गोव्यात काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीही चव्हाट्यावर आली आहे. दिग्विजय सिंह यांच्या धोरण दिरंगाईमुळे गोव्यात सत्ता स्थापनेचं स्वप्न भंगल्याचं काँग्रेसच्या नवनिर्वाचित नाराज आमदारांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे, यातील काही आमदारांनी आपली नाराजी पक्षाकडे व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या
VIDEO: पणजी : गोव्यात सत्तेचं स्वप्न भंगल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर
गोव्यानंतर मणिपूरही काँग्रेसच्या हातातून निसटलं?