C-Voter Survey on Rahul Gandhi : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वातावरण निर्मिती झाली आहे. भाजप, काँग्रेससह प्रत्येक पक्षानं निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. प्रत्येकजण आपापली रणनिती आखत आहे. याचाच भाग म्हणून काँग्रेसनं राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रा काढली आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा होत आहे. स्थानिक पातळीवरील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसनं हे पाऊल उचललं आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेवर एबीपी न्यूजनं सी व्होटरच्या मदतीनं सर्व्हे केलाय. राहुल गांधींच्या कामकाजावर यामध्ये प्रश्न विचारण्यात आले आहे.  यामध्ये लोकांनी आश्चर्यचकीत करणारी मत नोंदवलं आहे. 


'भारत जोडो यात्रा'मुळे राहुल गांधी यांना फायदा झाला का?
सी व्होटर सर्व्हेमध्ये (C-Voter Survey) राहुल गांधी यांच्या कामकाजबाबात लोकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. राहुल गांधींच्या कामकाजावर तुम्ही किती संतुष्ट आहात? असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला. भारत जोडो यात्रामुळे राहुल गांधींना फायदा झाला आहे. राजकीय दृष्टी राहुल गांधींची किंमत आणखी वाढल्याची प्रतिक्रिया लोकांनी दिली आहे. एबीपी न्यूजनं तामिळनाडू आणि केरळमध्ये याबाबतचा सर्व्हे केला आहे. 


राहुल गांधींच्या कामकाजावर किती संतुष्ट?
तामिळनाडूमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रादरम्यान 11 सप्टेंबर रोजी 63 टक्के जणांनी राहुल गांधींच्या कामकाजावर संतुष्ट असल्याचं सांगितलं. तर याआधी सहा सप्टेंबर रोजी 59 टक्के जणांनी संतुष्ट असल्याचं सांगितलं. एका आठवड्यात राहुल गांधींच्या बाजूनं मत करणाऱ्यांची संख्या वाढल्याचं दिसून आले. 
 
तामिळनाडूमध्ये किती जण असंतुष्ट? 
सहा सप्टेंबर रोजी तामिळनाडूमधील 25 टक्के लोकांनी राहुल गांधींच्या कामकाजावर असंतुष्ट असल्याचं सांगितलं. तर 11 सप्टेंबर रोजी 22 टक्के जणांनी असंतुष्ट असल्याचं सांगितलं. म्हणजेच, गेल्या आठवड्याच्या तुलनेत असुंष्ट लोकांची संख्या कमी झाल्याचं दिसले. याच प्रश्नवर सहा सप्टेंबर रोजी 16 टक्के जणांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलं तर 11 सप्टेंबर रोजी 15 टक्के लोकांना सांगू शकत नाही, असे उत्तर दिलेय. 


केरळमधील काय स्थिती?
राहुल गांधी यांच्या कामकाजावर संतुष्ट आहात का? यासंदर्भात केरळमधील लोकांनीही आपली प्रतिक्रिया दिली.  10 सप्टेंबर रोजी केरळमधील 56 टक्के जण संतुष्ट होते. तर 14 सप्टेंबर रोजी संतुष्ट लोकांची संख्या वाढून 60 टक्के झाली. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु होण्याआधी आणि यात्रा सुरु झाल्यानंतरचा वरील डेटा आहे. 10 सप्टेंबर रोजी 31 टक्के जण राहुल गांधींच्या कामकाजावर असंतुष्ट होते. तर 14 सप्टेंबर रोजी ही संख्या 30 टक्के झाली. 


एकूणच सारांश असा की, भारत जोडो यात्रामुळे राहुल गांधी यांना राजकीय फायदा झाला आहे.