Congress Bharat Jodo Nyay Yatra Crowdfunding: नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) पक्षानं 'भारत जोडो न्याय यात्रे'ला (Bharat Jodo Nyay Yatra) निधी देण्यासाठी आपली 'डोनेट फॉर जस्टिस' क्राउडफंडिंग मोहीम सुरू केली आहे. मोहिमेअंतर्गत लोकांना त्यांच्या देणगीच्या बदल्यात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या स्वाक्षरीचा टी-शर्ट आणि पत्र मिळेल. नवी दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयात काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांच्यासह या मोहिमेचा शुभारंभ करताना काँग्रेसचे खजिनदार अजय माकन म्हणाले की, मोहिमेअंतर्गत 670 रुपये किंवा त्याहून अधिक देणगी देणाऱ्या व्यक्तीला राहुल गांधींची स्वाक्षरी असलेली भेटवस्तू मिळेल आणि तुम्हाला टी-शर्ट मिळेल. 


न्याय किट 67 हजार रुपयांहून अधिक देणगीवर उपलब्ध 


"जे 67 हजार रुपये किंवा त्याहून अधिक देणगी देतील त्यांना 'न्याय किट' मिळेल, ज्यामध्ये टी-शर्ट, बॅग, बँड, बॅज आणि स्टिकर असेल. जो कोणी देणगी देईल, त्याला राहुलजींच्या स्वाक्षरीचं पत्र मिळेल आणि तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल.", माकन यांनी असंही सांगितलं की, या मोहिमेमागील संकल्पना आणि पक्षाच्या पहिल्या मोठ्या क्राउडफंडिंग मोहिमेचा उद्देश 'डोनेट फॉर देश' हा पैसा मिळवण्यासाठी नव्हता तर कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासाठी होता.


आतापर्यंत मिळाले दोन कोटी 


गेल्या वर्षी 18 डिसेंबर रोजी सुरू करण्यात आलेल्या पक्षाच्या 'डोनेट फॉर देश' क्राउडफंडिंग मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत एकूण 20 कोटी रुपये जमा झाले आहेत. 'डोनेट फॉर जस्टिस' मोहीम सुरू केल्यानंतर दोन तासांत दोन कोटी रुपये जमा झाले, अशी माहिती काँग्रेसच्या खजिनदारांनी दिली आहे. अपेक्षेपेक्षा कमी निधी मिळाल्याबद्दल विचारलं असता माकन म्हणाले, "आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पैसे उभे करून निवडणूक लढवू शकत नाही. या क्राउडफंडिंगद्वारे निवडणुकीसाठी आमचा सर्व निधी मिळेल, असं कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे आणि हे असंच काहीतरी आहे.”


विश्रांतीनंतर आजपासून भारत जोडो न्याय यात्रेचा पुन्हा प्रवास सुरू


"इतर कोणत्याही राजकीय पक्षानं केलेल्या क्राउडफंडिंगपेक्षा हे जास्त आहे. कारण आप आणि भाजप या दोन्ही पक्षांनी याची सुरुवात केली होती, पण ते 1 कोटीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो न्याय यात्रा 26 ते 27 जानेवारी अशा दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी थांबली आहे. रविवारी म्हणजेच, आजपासून पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथून भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा सुरू होईल. 29 जानेवारी रोजी बिहारमध्ये प्रवेश करणं आणि 31 जानेवारी रोजी मालदा मार्गे पुन्हा पश्चिम बंगालमध्ये परतणं अपेक्षित आहे.