नवी दिल्ली : भारतात टीव्हीवर कंडोमच्या जाहिराती दाखवण्यासाठी सरकारने वेळ ठरवून दिली आहे. या जाहिराती लहान मुलांसाठी निरुपयोगी आहेत. त्यामुळे रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच जाहिराती दाखवाव्यात, असे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत.
कंडोमच्या जाहिराती या एका विशिष्ट वयोगटातील व्यक्तींसाठी आहेत. त्या लहान मुलांसाठी निरुपयोगी आहेत. त्यामुळे त्या रात्री 10 ते सकाळी 6 या रात्रीच्या वेळेतच दाखवल्या जाव्यात, अशी सूचना सरकारने टीव्ही चॅनल्सला केली आहे.
लहान मुलांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या किंवा त्यांना हानिकारक गोष्टींविषयी रुची नर्माण करणाऱ्या जाहिरातींना परवानगी देण्यात येऊ नये, या नियमाअंतर्गत हा आदेश दिला असल्याचं सरकारने म्हटलं आहे.
गर्भ निरोधक आणि एड्स नियंत्रणासाठी सरकारकडूनही कंडोमचा प्रचार केला जातो. बॉलिवूडचे अनेक कलाकारही कंडोमच्या जाहिराती करतात.