नवी दिल्ली: धर्मावर आधारित 2011 साली झालेल्या जनगणनेचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. या आकडेवारीनुसार देशात हिंदूंची संख्या 79.8 टक्के तर हिंदू घरांची संख्या ही 81 टक्के इतकी आहे. म्हणजेच देशात सुमारे 20.24 कोटी हिंदू कुटुंब राहतात.
देशात मुस्लिम घरांची संख्या 12.5 टक्के तर लोकसंख्येच्या तुलनेत देशाच्या 14.23 टक्के मुस्लिम आहेत. म्हणजेच देशात 3.12 कोटी मुस्लिम कुटुंब राहतात.
धर्मनिहाय लोकसंख्या जाहीर करण्यावरुन याआधी बराच वाद झाला होता. हिंदूंची लोकसंख्या वेगानं कमी होत असल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता. मात्र गेल्या दहा वर्षात सर्वच धर्मात सरासरी समान वाढ झाली आहे.
जनगणनेनुसार देशात 24.88 कोटी कुटुंब आहेत. त्यामध्ये 20.24 कोटी हिंदू, 3.12 कोटी मुस्लिम, 63 लाख ईसाई,41 लाख शीख आणि 19 लाख जैन कुटुंबांचा समावेश आहे.