मुंबई : जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या आयसिस या दहशतवादी संघटनेने आपला मोर्चा आता भारताकडे वळवला आहे. बाबरी मस्जिद, मुझफ्फरनगर दंगल यांचा सूड आम्ही घेऊ, अशी धमकी देणारा व्हिडिओ आयसिसनं प्रसारित केला आहे.

 
ठाण्यातून पळून जाऊन आयसिसमध्ये दाखल झालेला फहाद शेख या व्हिडीओत धमकी देताना दिसत आहे. 2014 साली फहाद शेख सीरियात गेला होता.

 

 

'आम्ही परत येऊ, पण यावेळी हातात तलवार घेऊन. बाबरी मस्जिद, मुझफ्फरनगरच्या दंगली, गुजरात आणि काश्मीरमधील मुस्लीमांच्या हत्येचा बदला घेऊ' आम्ही लवकरच भारतात येत असल्याची धमकी या व्हिडीओत देण्यात आली आहे.

 
गेल्या वर्षी रक्कामध्ये झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला ठाण्यातील मित्र शहीद तन्कीला त्याने श्रद्धांजली दिली आहे.

 
सुमारे 22 मिनिटांचा व्हिडिओ अरबी भाषेमध्ये आहे. प्रामुख्याने भारत आणि दक्षिण आशियाई राष्ट्रांना यातून इशारा देण्यात आला आहे.

 

 

पाहा व्हिडिओ :