नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसनंतर आता सीएनजी (CNG ), पीएनजीही ( PNG) महागलं आहे. दिल्लीत सीएनजी गॅस 70 पैशांनी तर पाइप्ड नॅच्युअरल गॅस (PNG) 91 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. सकाळी 6 पासून दर लागू करण्यात आले आहे.
इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (आयजीएल) ने सांगितले की, CNGची किंमत 43.40 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. तर नोयडा, ग्रेटर नोयडा, गाजियाबाद याठिकाण सीएनजीची किंमत 49.08 रुपये प्रतिकिलोला दर आहे. दिल्लीत पीएनजीची किंमत 28.41 प्रति एसएम आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना 14.2 किलो वजनाच्या विना अनुदानित सिलेंडरसाठी 819 रुपये मोजावे लागणार आहे. 24 फेब्रुवारीला एलपीजी गॅसच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. एका महिन्यात चौथ्यांदा वाढ झाल्याने केवळ तीन आठवड्यातच सिलेंडरच्या किंमतीत एकूण 100 रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे हैराण झालेल्या सामान्य जनतेला या सिलेंडरच्या किंमती वाढीमुळे धक्का बसला आहे. याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे.
दरम्यान पेट्रोल, डिझेलचे दर हळू हळू शंभरीकडे चालले आहेत. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल दर 97.57 रुपयांवर पोहोचलं आहे, तर डिझेलचे दर 88.60 रुपये झाले आहे.
संबंधित बातम्या :