Angarki Sankashti Chaturthi 2021 : गणेश भक्तांसाठी अतिशय महत्वाची असणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आज आहे. ही 2021 या नव्या वर्षातील पहिली संकष्टी. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते, अशी भावना आहे. या दिवशी मंदिरांमध्ये गर्दी असते मात्र आज कोरोनामुळं ही गर्दी तुलनेनं कमी पाहायला मिळणार आहे.


आज या वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी आहे. आज चंद्रोदय 9.16 मिनिटांनी होणार आहे. संकष्टीचा अर्थ दुः खाचा पराभव करणारा असा होतो. भाविकही अगदी भक्तीभावाने गणेशाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात. संकष्टी चतुर्थी हा दिवस लाडक्या गणपतीला समर्पित केलेला आहे. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते, यामुळे घरात प्रसन्न वातावरण बनतं. हिंदू पंचांगानुसार संकष्टी चतुर्थीचा व्रत कृष्ण पक्ष चतुर्थीला ठेवला जातो. पूर्ण वर्षात संकष्टी चतुर्थीचे 13 व्रत ठेवले जातात.


संकष्टी चतुर्थीची पूजा- विधी


- सकाळी उठल्यानंतर आधी आंघोळ करा आणि स्वच्छ धुतलेले कपडे घाला.
- सकाळी गणपतीची पूजा करा.
- गणपतीला तीळ, गूळ, लाडू, दुर्वा, चंदन अर्पण करा. वंदन करा.
- संध्याकाळी चंद्र उगवण्यापूर्वी गणपतीचे पूजन करा.
- व्रत कथा सांगा किंवा ऐका.
- चंद्राला अर्घ्य अर्पण करा.
- या दिवशी गणपतीच्या मंत्रांचा जप करावा
- पूर्ण दिवसभर उपवास ठेवावा. चंद्रोदयानंतर सोडावा.