Ayodhya Ram Mandir Update : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अयोध्येमध्ये (Ayodhya) प्रभू श्रीराम मंदिर उभारणीचं काम जोरात सुरू आहे. राम मंदिराच्या पहिल्या टप्प्यांत चौथऱ्याचं काम पूर्ण झालं आहे. यानंतर आता दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. गाभाऱ्याच्या कामापासून या टप्प्याला सुरुवात होईल. आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या हस्ते पायाभरणी केल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यांतर्गत गाभाऱ्याच्या उभारणीचं काम आजपासून सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्येत राम मंदिराच्या गर्भगृहाची पायाभरणी करणार आहेत. राम मंदिराच्या चौथऱ्याचं काम पूर्ण झाल्यानंतर सर्वाचं लक्ष आता राममंदिराच्या गाभाऱ्याकडे लागलं आहे. आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिराच्या गाभाऱ्याच्या कामाचा पहिला दगड ठेवून पायाभरणी करतील. यासह मंदिराच्या गाभाऱ्याच्या कामाला सुरुवात होईल.
डिसेंबर 2023 पर्यंत गाभाऱ्याचं काम पूर्ण
गाभाऱ्याच्या पायाभरणी कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास, सरचिटणीस चंपत राय यांच्यासह सुमारे 250 संत आणि राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. श्री राम मंदिराच्या गाभाऱ्याच्या पायाभरणीनंतर डिसेंबर 2023 पर्यंत गाभाऱ्याचं काम पूर्ण होईल, असं सांगण्यात येत आहे. त्यानंतर 2024 च्या मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरात रामललाची स्थापना केली जाईल.
दगडांवर नागर शैलीचा वापर
राम मंदिराच्या बाजूनं 9 नोव्हेंबर 2019 रोजी निर्णय आला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिराच्या बांधकामाची पायाभरणी केली. सध्या राम मंदिर उभारणीचं काम जोरात सुरू आहे. सध्या राम मंदिराच्या उभारणीसाठी गुलाबी दगडांचा वापर केला जात आहे. हे राजस्थानच्या भरतपूरच्या बन्सी पर्वतातून काढले जात आहेत. या दगडांवर नागर शैलीतील कलाकृती कोरल्या जात आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या