भोपाळ : मध्य प्रदेशमधील पुराचा फटका आता केवळ सर्वसामान्य जनतेलाच नव्हे, तर व्हीव्हीआयपी लोकांनाही बसू लागला आहे. पन्ना जिल्ह्यात पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचलेले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही या पुराचा फटका बसला.


 

मध्यप्रदेशमधील अनेक जिल्ह्यांना पुराचा जोरदार फटका बसला आहे. पूरग्रस्त गावांचा दौरा करण्यासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांना दुथडी भरुन वाहणारी नदी पार करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली. पोलिसांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी उचलून नदी ओलांडण्यास मदत केली. शिवराजसिंह यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.



उत्तर भारतातील चार मोठ्या राज्यांमध्ये पावसाना हाहा:कार माजवला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हृदय पिळवटून टाकणारे फोटो समोर येत आहेत.

 

विशेषत: मध्य प्रदेशमध्ये पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी घुसलं आहे. शेकडो लोक बेघर झाले आहेत.