आत्महत्याग्रस्त विदर्भ, सिंचन प्रकल्पासाठी फडणवीसांची केंद्राकडे मदत
एबीपी माझा वेब टीम | 23 Apr 2017 11:03 PM (IST)
नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी केंद्राकडे मदत मागण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगीच्या बैठकीत केंद्राकडे ही मागणी केली. राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नीती आयोगाच्या कार्यकारी समितीची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, अधिकारी आणि नीती आयोगाच्या सदस्यांनी हजेरी लावली होती. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अनुपस्थित होते.