Climate change : ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Climate change) हवामान बदलाचे परिणाम जगभर दिसू लागले आहेत. त्याच्या प्रभावामुळे यावर्षी (2024) फेब्रुवारीमध्ये विक्रमी उष्मा येण्याची शक्यता आहे. 'द गार्डियन' या इंग्रजी वृत्तपत्राने आपल्या एका वृत्तात याचा उल्लेख केला आहे. अहवालानुसार, फेब्रुवारीमध्येच जगभरातील समुद्राच्या पातळीच्या तापमानात वाढ झाल्यामुळे, वर्षातील सर्वात लहान महिना असलेल्या फेब्रुवारीमध्ये पारा नवीन विक्रमी पातळीवर वाढत आहे. हवामानशास्त्रज्ञांनी यासाठी एल निनोला जबाबदार धरले आहे, ज्यामुळे जगभरात उष्णता वाढली आहे.

उष्णता का वाढत आहे?

वृत्तपत्रात म्हटले आहे की, “पृथ्वी झपाट्याने तापत आहे. समुद्राचे तापमान झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे हवामानात बदल होत आहे. 2023 नंतर ज्या पद्धतीने 2024 मध्ये समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात विक्रमी वाढ झाली आहे, ती अपेक्षेपेक्षा जास्त आहे. मात्र, यामागील कारण समजून घेण्यासाठी सखोल संशोधन केले जात आहे.

Continues below advertisement

द गार्डियनच्या वृत्तानुसार, बर्कलेचे पृथ्वी वैज्ञानिक जेके हॉसफादर यांच्या मते, जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबर, ऑक्टोबर, सप्टेंबर, ऑगस्ट, जुलै, जून आणि मे नंतर फेब्रुवारी महिना सर्वात उष्ण असणार आहे. अलिकडच्या आठवड्यात तापमानात झालेली वाढ पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा 2 अंश सेल्सिअस जास्त असू शकते.

एल निनो म्हणजे काय?

एल निनो प्रभाव ही एक विशेष हवामान घटना आहे जी मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राचे तापमान सामान्यपेक्षा जास्त असते तेव्हा उद्भवते. सोप्या भाषेत या परिणामामुळे तापमानात लक्षणीय वाढ होते. त्यामुळे पश्चिम पॅसिफिकमधील गरम पाणी विषुववृत्ताच्या बाजूने पूर्वेकडे सरकू लागते, ज्यामुळे भारताच्या हवामानावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत दक्षिण आशिया प्रदेशाला भयंकर उष्णतेचा सामना करावा लागतो आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागते. भारत देखील याच प्रदेशात आहे, त्यामुळे एल निनोच्या प्रभावामुळे येथे उष्णता वाढते.

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या