नवी दिल्ली : आयसीएसई (ICSE) बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल आज घोषित होणार, असं जाहीर केलं आहे. द कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ने शुक्रवारी 10 जुलैला त्यांच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होतील, असं सांगितलं आहे.


आयसीएसई कडून result.cisce.org या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर आज दुपारी 3 वाजता निकाल जाहीर होईल, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.


CBSE result | अद्याप निकालाची तारीख जाहीर नाही; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सीबीएसई बोर्डाचे आवाहन


कसा बघायचा निकाल




  • ICSE चा निकाल आज दुपारी 3 नंतर बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर होईल. त्यासाठी https://results.cisce.org/ किंवा www.cisce.org या वेबसाईटला भेट द्या.

  • बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.cisce.org/ जा

  • तिथे Career पोर्टलला क्लिक करा आणि यावर्षीच्या तुमच्या परीक्षेची कॅटेगरी निवडा

  • त्यानंतर रोल नंबर आणि इतर माहिती भरा

  • Print Result किंवा डाऊनलोड रिझल्ट असा पर्याय येईल

  • इथे थेट तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.


अद्याप निकालाची तारीख जाहीर नाही
सीबीएसई बोर्डाच्या (CBSE) इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्याच्या बातम्या काही वेबसाईटवर प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, अद्याप निकालाची तारीख जाहीर झाली नसल्याचं सीबीएसई बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन बोर्डाने केलं आहे. काही वेबसाईट वर 18 जुलै 12 वीच्या वर्गाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर 10 वी इयत्तेचा निकाल 15 ते 17 जुलैदरम्यान जाहीर करण्यात येणार असल्याचं प्रसिद्ध करण्यात आलं होतं.
केंद्रीय माध्यमिक शिक्षा परिषदने (CBSE) अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करत अद्याप बोर्डाकडून निकालाची कोणतीही तारीख जाहीर केली नसल्याचं सांगितलं आहे. सीबीएसईद्वारा निकालाची माहिती अधिकृत संकेतस्थळ cbseresults.nic.in यावर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या वेबसाईटवर चेक करण्यास सांगितले आहे.

UNIVERSITY EXAMS | सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंशी चर्चा करूनच परीक्षा न घेण्याचा निर्णय - उदय सामंत