CJI Announces Launch of Suswagatam Portal: सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) गुरुवारी 'सुस्वागतम' पोर्टल (Suswagatam Portal) सुरू करत असल्याची घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (CJI D. Y. Chandrachud) यांनी या पोर्टलची घोषणा केली. या पोर्टलमुळे वकील (Advocate), व्हिजिटर्स (Visitors), इंटर्न आणि इतरांना सर्वोच्च न्यायालयातील कामांसाठी ऑनलाईन नोंदणी (Online Registration) करता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रवेश करण्यासाठी ई-पास (E-Pass) याच पोर्टलवरुन मिळणार आहेत.


सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं जम्मू आणि काश्मीरला पूर्वीच्या राज्याचा विशेष दर्जा देणारं घटनेतील कलम 370 रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या सुनावणीसाठी एकत्र येताच, CJI नी या सुविधेबाबत ऑनलाईन घोषणा केली. 


सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड 'सुस्वागतम्' पोर्टलची घोषणा करताना म्हणाले की, "सुस्वागतम्' हे वेब आधारित आणि मोबाईल फ्रेंडली अॅप्लिकेशन आहे. जे युजर्सना ऑनलाईन नोंदणी करण्यास आणि कोर्टाच्या सुनावणीला उपस्थित राहणं, वकिलांना भेटणं... अशा विविध उद्देशांसाठी ई-पासची नोंदणी करण्यासाठी फायदेशीर ठरेल." 


न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, 25 जुलै 2023 पासून 'सुस्वगतम' पोर्टलची पायलट प्रोजेक्ट म्हणून टेस्टिंग घेण्यात आली आणि त्याला युजर्सकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, 9 ऑगस्टपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर पोर्टलद्वारे 10 हजारहून अधिक ई-पास जारी करण्यात आले आहेत. या पोर्टलमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कामांसाठी सकाळी रांगेत थांबण्याची गरज नाही. सर्व पास ऑनलाईन मिळतील. आज सकाळपासून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. 


कोर्टात उपस्थित असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी खंडपीठाला सांगितलं की, एंट्री पास घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या काउंटरवर सकाळच्या वेळी लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, अॅप्लिकेशन कसं वापरायचं याचे व्हिडीओ ट्यूटोरियल वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे.