मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर बसलेल्या एका व्यक्तीने अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरचीपूड टाकली. ज्यावेळी केजरीवाल त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडले, तेव्हा त्यांना धक्काबुक्की करत त्याने मिरची पूड फेकली. केजरीवाल यांच्या डोळ्यात पूड गेल्याचंही समजतं.
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकणाऱ्या अनिल कुमार हिंदूस्ताने नावाच्या आरोपीला सुरक्षारक्षकांनी अटक केली आहे.