Chief Minister Yogi Adityanath : उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) लोकसभा निवडणुकीत 2024 च्या खराब कामगिरीनंतर अनेक चर्चा सुरू आहेत. आरएसएस प्रमुख मोहन भागवत (RSS chief Mohan Bhagwat) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी शनिवारी (15 जून) गोरखपूरमध्ये एकाच दिवसात दोनदा बंद दाराआड बैठका घेतल्याचे वृत्त आहे. ही बैठक सुमारे 30 मिनिटे चालली.


इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आदित्यनाथ यांनी शनिवारी दुपारी कॅम्पियरगंज भागातील एका शाळेत भागवत यांची पहिल्यांदा भेट घेतली. संघाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोहन भागवत येथे आले होते. सीएम योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवत यांच्यातील दुसरी बैठक पक्कीबाग परिसरातील सरस्वती शिशु मंदिरात रात्री साडेआठ वाजता झाली.






पराभवाची कारणे चर्चेत 


मोहन भागवत यांची ही भेट नियमित नसल्याची चर्चा आहे. तीन दशकांपासून संघाशी संबंधित भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे की, भागवत उत्तर प्रदेशातील पराभवामागील मुख्य कारणांबाबत आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार होते. याच कारणावरून या दोन्ही बैठका झाल्या असण्याची शक्यता आहे. 


यूपीमध्ये भाजप सर्वात मजबूत स्थितीत असल्याचे दिसत होते, परंतु निकाल त्याच्या उलट होते. येथील 80 जागांपैकी भाजपला केवळ 33 जागा मिळाल्या. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने 71 जागा जिंकल्या होत्या आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने 62 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे, यूपीमध्ये इंडिया अलायन्सने 43 जागा जिंकल्या आहेत. यापैकी सपाने 37 तर काँग्रेसने 6 जागा जिंकल्या आहेत.


अयोध्या मंडलमध्ये भाजपची धुळदाण


यूपीमध्ये सर्वात धक्कादायक निकाल अयोध्या विभागाचे होते. अयोध्या राम मंदिराच्या आधारे भाजपला संपूर्ण देशात चांगले निकाल अपेक्षित होते, परंतु अयोध्या विभागातील बहुतांश जागांवर पक्षाचा पराभव झाला. एवढेच नाही तर अयोध्या राम मंदिर ज्या फैजाबादमध्ये येते त्या जागेवरही भाजपला विजय मिळवता आला नाही.


इतर महत्वाच्या बातम्या