नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह अन्य विरोधीपक्षांनी महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे. काँग्रेसह 71 खासदारांनी यासंदर्भातील नोटिसीवर स्वाक्षरी केली आहे.


राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली आणि नोटीस दिली.

त्यानंतर दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसनं भाजपवर गंभीर आरोप केले. महाभियोगाच्या नोटीसवर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, बसपा आणि मुस्लिम लिग या पक्षाचा समावेश आहे.

सीबीआय न्यायाधीश बी.एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या. त्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत.