बेळगाव :  बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे (Belgaum Cantonment Board) मुख्य कार्यकारी अधिकारी के.आनंद (K. Anand) यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी आत्महत्या केली आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आले आहे.  यामुळे कॅम्प परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंंदाज आहे. 


गेल्या आठ दिवसांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (Cantonment Board) कर्मचारी भरतीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी  बंगळूरू आणि दिल्ली येथून आलेले सीबीआय (CBI) अधिकारी करत होते. के आनंद यांच्या सोबत कॅन्टोन्मेंट बोर्डातील अधिकाऱ्यांची देखील सी बी आय अधिकारी कसून चौकशी करत आहेत.


गेल्या दोन दिवसापासून के आनंद आपल्या शासकीय निवासस्थानात होते. शनिवारी सकाळी त्यांच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने दोन दिवस झाले दरवाजा उघडला नाही आणि घरातून दुर्गंधी येत असल्याचे कॅम्प पोलिसांना कळवले.कॅम्प पोलिसांनी त्वरित जावून दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता के आनंद हे मृतावस्थेत आढळले.घटनेचे वृत्त कळताच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.


नोकर भरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार


के आनंद हे मूळचे चेन्नई येथील असून ते 2015 च्या इंडीयन डिफेन्स  इस्टेट सर्व्हिसच्या बॅचचे तरुण अधिकारी होते.ते अविवाहित होते. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नोकर भरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती.  त्यांची दखल सी बी आय ने घेतली असून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.आनंद यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सी बी आय अधिकाऱ्यांनी सुरू केली होती.


बेळगावातील कॅन्टोन्मेंट हे कर्नाटकातील एकमेव कॅन्टोन्मेंट


नोकर भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. क्लार्क , स्टेनोग्राफर आणि अन्य पदासाठी एकूण एकोणीस जागा भरण्यात आल्या होत्या. त्या संबंधी मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती.त्यामुळे सी बी आय अधिकाऱ्यांचे पथकाने बेळगावातील कॅम्प मधील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. बेळगावातील कॅन्टोन्मेंट हे कर्नाटकातील एकमेव कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे.


हे ही वाचा :


'मी लेचापेचा नाही, 15 दिवस डेंग्यूमुळे आजारी, राजकीय आजार स्वभावात नाही', अजित पवारांकडून विरोधकांचा समाचार