रायपूर : गोहत्या करणाऱ्याला गुजरातनं जन्मठेपेची तरतूद केल्यानंतर आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह आक्रमक झाले आहेत. गोहत्या करणाऱ्यास आम्ही फासावर लटकवू असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.


सध्या उत्तर प्रदेशमध्ये अवैध कत्तलखान्यांविरोधात मोहीम सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान आलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानसार, रमणसिंह यांना गोहत्येसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना, छत्तीसगडमध्ये गेल्या 15 वर्षात एकतरी गोहत्या झाली आहे का? असा प्रश्न उपस्थीत करुन, जर असे झाल्यास त्याला फासावर लटकवलं जाईल.

उत्तर प्रदेशमध्ये अवैध कत्तलखान्यांविरोधात मोहीम सुरु झाल्यापासून इतर भाजप शासित राज्यांमधूनही गोहत्याविरोधातील मोहीम अधिकच तीव्र झाली आहे. यासंदर्भातच गुजरात विधानसभेनं प्राणी संरक्षण कायद्यात सुधारणा केल्या आहेत. त्या अंतर्गत गोहत्या करणाऱ्यास जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केली आहे.

संबंधित बातम्या

उत्तर प्रदेशनंतर झारखंडमध्येही अवैध कत्तलखान्यांवर बंदी

निवडणूक प्रचारात घोषणा, सत्तेत येताच कत्तलखान्यांवर कारवाई