Continues below advertisement

नागपूर: छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील अबूझमाडच्या जंगलात छत्तीसगड पोलीस तसेच केंद्रीय सुरक्षा दलांसोबत माओवाद्यांच्या झालेल्या चकमकीत माओवाद्यांच्या (Naxalite) सर्वोच्च अशा सेंट्रल कमिटीच्या आणखी दोन वरिष्ठ कॉम्रेडला ठार मारण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. अबूझमाड (Nagpur) जंगलात आज सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि स्फोटकेही हस्तगत करण्यास सुरक्षा दलाने यश मिळले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलमुक्त भारत करण्याची मोहिम हाती घेतली असून सरकारने त्या दृष्टीने प्रयत्न चालवल्याचं पाहायला मिळत आहे.

चकमकीनंतर संध्याकाळी सुरक्षा दलांनी केलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये घटनास्थळी सेंट्रल कमिटी मेंबर आणि माओवाद्यांचा वरिष्ठ कॉम्रेड राजू दादा उर्फ कट्टा रामचंद्र रेड्डी तसेच कोसा दादा उर्फ कादरी सत्यनारायण रेड्डी या दोघांचे मृतदेह आढळून आले. या दोघांवर छत्तीसगडमध्ये प्रत्येकी 40-40 लाख रुपयांचे बक्षीस होते. सुरक्षा दलांना घटनास्थळी एक AK 47 रायफल, 1 इंसास रायफल, बीजीएल रॉकेट लॉन्चर आणि मोठ्या प्रमाणावर स्फोटके हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. मारले गेलेले नक्षलवादी राजू दादा आणि कोसा दादा हे दोघेही माओवादी कॉम्रेड्स गेले 30 वर्ष जंगलातील सशस्त्र माओवादी लढ्यात सहभागी होते आणि त्यांनी आजवर सुरक्षा दलांना मोठे नुकसान पोहोचवले होते.

Continues below advertisement

दरम्यान, विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसात छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या 4 वरिष्ठ कॉम्रेडला कंठस्नान घालण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे माओवाद्यांना सुरक्षा दलाकडून एकानंतर एक धक्के बसत आहेत. गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून नक्षलवादमुक्त भारताची मोहिम सुरू करण्यात आली असून या मोहिमेला गेल्या काही महिन्यांत चांगले यश मिळाल्याचंही पाहायला मिळत आहे.

हेही वाचा

गावात पाणी, घरात पाणी, शेतातली पीकं पडली आडवी; सोलापूर, धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा