गावात पाणी, घरात पाणी, शेतातली पीकं पडली आडवी; सोलापूर, धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झालं आहे.
Continues below advertisement
Dharashiv and solapur heavy rain
Continues below advertisement
1/12
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झालं आहे.
2/12
माढा तालुक्यातील वाकाव तांदुळवाडी, राहुल नगर आणि दारफळ या गावांना पडू लागला पाण्याचा वेढा बसला आहे. पावसामुळे भूम, परांडा इथही हाहाकार माजला आहे.
3/12
हा महाप्रलय आहे, हा निसर्गाचा मोठा अपघातच म्हणाव लागेल. शेतकऱ्याच्या घरात पाणी, शेतात पीकं आडवी झाल्याने डोळ्यात अश्रूंच्या धारा पाहायला मिळत आहेत.
4/12
धाराशिव जिल्ह्यातील परंडा आणि भूम तालुक्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे बांधावर जाऊन पाहणी केल्या आमदार तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.
5/12
सरकार खंबीरपणे उभा राहील, सरकारचे पंचनामे आणि मदत होईल, मात्र त्या अगोदर नुकसान ग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल, असे म्हणत तानाजी सावंत यांच्याकडून कार्यकर्त्यांना नुकसान ग्रस्तांच्या याद्या करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
Continues below advertisement
6/12
खरिपाची पिके गेली, रब्बीची पेरणी होणार नाही, पुढे मोठा पाऊस आहे, पेरण्या लांबल्या गेल्या तर ओल्या दुष्काळाची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
7/12
धाराशिवच्या परांडा येथील देवगावात चांदणी नदीचे पाणी वस्तीत घुसलं आहे. त्यामुळे, वस्तीतील घरांना कुलूप लावून लोक बाहेर पडली आहेत. चांदणी नदीला आलेल्या पुरामुळे गावाला पाण्याचा वेडा, महिलांसह गावकरी छतावर चढले होते
8/12
पुराच्या पाण्यात पूर्णपणे संसार भिजला, काही घरांत सकाळपासून अन्नाचा कण शिजला नाही, असा थरारक अनुभव लोकांनी सांगितला
9/12
भिंत खचली, चूल विझली होतं नव्हतं गेलं, अशीच परिस्थिती देवगावच्या वस्तीत पाहायला मिळाली, वस्तीत गुडघाभर पाणी आहे, पुराच्या पाण्यातून मार्ग काढत जीव वाचवत आहेत.
10/12
धाराशिवच्या देवगाव इथ घराच्या मंदिराच्या छतावर चढून गावकरी सैन्य दलाकडून रेस्क्यू करण्याची वाट पाहत होते. 24 जणांना सुखरूप बाहेर काढलं आहे.
11/12
वस्तीच्या कडेला 30 ते 35 फूट पाणी, हेलिकॉप्टर आलं नसतं तर आम्ही वाचलो नसतो, असे रेस्क्यू करण्यात आलेल्या ग्रामस्थांनी सांगितले
12/12
सोलापूर जि्ल्ह्यातील करमाळ्यातील सीना नदीकाठी पाणी पातळी वाढू लागल्याने अनेक गावात पाणी शिरू लागले. करमाळा तालुक्यातील संगोबा पूल, निलज, खडकी, बिटरगाव, अलजापूर ,तरडगाव , बालेवाडी , पोटगाव, बोरगाव ,दिलमेश्वर या गावानं सीना नदीच्या पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.
Published at : 22 Sep 2025 05:54 PM (IST)