Ram Mandir Trust : किमान लोकांनी देवालाही तरी फसवू नये असं म्हणतात. मात्र, रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला याच्या उलट अनुभव आला आहे. ट्रस्टच्यावतीने चालवण्यात आलेल्या समर्पण अभियानात आतापर्यंत सुमारे 5457.94 कोटींचा निधी जमवला आहे. मात्र, दान म्हणून आलेल्या रक्कमेतील जवळपास 22 कोटींच्या रक्कमेचे चेक बाऊन्स झाले आहेत. त्याबाबतचा एक वेगळा अहवाल तयार केला जात आहे.
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे जमा झालेला निधी अद्यापही पूर्णपणे मोजली नाही. काही जिल्ह्यानिहाय ऑडिटींगचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. सध्या देशातून आलेल्या निधीची मोजणी सुरू आहे.
जवळपास 22 कोटींच्या धनादेशाची रक्कम वटली नाही. त्याचा एक अहवाल तयार केला जात आहे. त्यातून हे चेक का वटले नाहीत याचा खुलासा होणार आहे. काही तांत्रिक कारणांमुळे बाऊन्स झालेल्या चेकबाबत बँकेसोबत चर्चा करण्यात येणार आहे. सध्या मिळालेल्या वृत्तानुसार, कूपन आणि पावतींच्या माध्यमातून 2253.97 कोटींचीा निधी जमवण्यात आला. तर, डिजीटल माध्यमातून 2753.97 कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे. एसबीआय-पीएनबी आणि बँक ऑफ बडोदामधील बचत खात्यात जवळपास 450 कोटी रुपयांचा निधी जमला आहे. ट्रस्टने निधीसाठी दहा रुपये, शंभर रुपये आणि एक हजार रुपयांचे कूपन छापण्यात आले होते. या रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेसाठी पावत्यांचा वापर करण्यात आला.
ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी तयार केलेल्या अहवालानुसार, 10 रुपयांच्या कूपनच्या माध्यमातून 30.99 कोटी रुपये, 100 रुपयांच्या कूपनच्या माध्यमातून 372.48 कोटी रुपये आणि एक हजार रुपयांच्या कूपनच्या माध्यमातून 225.46 कोटी रुपये आणि पावती पुस्तकांच्या माध्यमातून 1625.04 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. अशा प्रकारे 2253.97 कोटींचा निधी जमवण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: