भोपाळ : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांच्या मृत्यूची मालिका थांबायचं नाव घेत नाही. ज्वाला नावाच्या मादी चित्त्याच्या आणखी दोन पिलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर मरण पावलेल्या चित्त्यांची संख्या पाच झाली आहे. यामध्ये आफ्रिकेतून आणलेल्या दोन बिबट्यांचा समावेश आहे. चित्याच्या या पिलांचा मृत्यू अशक्तपणामुळे आणि वाढत्या उकाड्यामुळे झाला असल्याचं वनविभागाने स्पष्ट केलं आहे.
वनविभागाने एक प्रेस नोट जारी करून त्यात म्हटले आहे की, "मादी चित्ता ज्वालाच्या निगराणी पथकाला ती तिच्या पिलांसह एका जागी बसलेली आढळली. काही वेळाने तिचे दोन पिल्ले मृत्यूमुखी पडल्याचं दिसून आलं. निरीक्षण पथकाने पशुवैद्यकांना कळवल्यावर ते घटनास्थळी पोहोचले.
जन्मापासूनच अशक्त असल्याने अशक्तपणामुळेच पिलांचा मृत्यू झाल्याचे दिसत असल्याचे वनविभागाने सांगितले. चित्ता ज्वाला सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आली होती. तिला पूर्वी सिया या नावाने ओळखले जायचे. यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तिने चार पिलांना जन्म दिला होता.
भारतातील चित्ता नामशेष घोषित झाल्यानंतर 70 वर्षांनी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी 'प्रोजेक्ट चीता' कार्यान्वित करण्यात आले आहे. या अंतर्गत दक्षिण आफ्रिकेतील देशांतून दोन तुकड्यांमध्ये चित्ते येथे आणण्यात आले आहेत.
नामिबियातील चित्त्यांपैकी एक असलेल्या साशाचा 27 मार्च रोजी मूत्रपिंडाच्या आजारामुळे मृत्यू झाला. तर दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या उदय या चित्ताचा 23 एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेतून आणलेली दक्षा ही मादी चित्ता जखमी झाली होती, त्यानंतर तिचा मृत्यू झाला. भारतातील वाढते तापमान हे या चित्यांच्या मृत्यूमागे कारण असल्याचंही सांगण्यात येतंय.
एकूण 20 बिबट्या आणण्यात आले होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात गेल्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय उद्यानात पाच मादी आणि तीन नरांसह आठ नामिबियाच्या चित्त्यांना सोडण्यात आले होते. यानंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते येथे आणण्यात आले. भारतामध्ये जन्मलेल्या चार पिलांसह 24 चित्तांपैकी, कुनो नॅशनल पार्कमध्ये आता 17 प्रौढ आणि तीन पिल्ले आहेत.
ही बातमी वाचा :