Chandrayaan 3 Landing Update: भारताचे चांद्रयान (Chandrayaan-3) लँडर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं असून त्यासाठी वातावरण पोषक असल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. चांद्रयान आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होणार असून अशी कामगिरी करणारा भारत हा पहिलाच देश असणार आहे. 


भारताचं महत्वाकांक्षी चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालंय. चांद्रयान-3 लॅण्ड व्हायला अवघे दोन तास उरलेत आणि भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्याकडे लागलंय. आज सायंकाळची सहा वाजून 4 मिनिटांची वेळ भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. कारण हीच ती वेळ आहे जेव्हा चांद्रयान-3 चंद्रावर लॅण्ड होणार आहे. त्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे. 


भारतासाठी अत्यंत अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि गौरवाची असलेली चांद्रयान-3 मोहीम आता अखेरच्या टप्प्यात आहे. चांद्रयान-३च्या सॉफ्ट लॅण्डिंगचं काऊंटडाऊन काल संध्याकाळपासून सुरू झालंय. लँडर मॉड्युलसोबत अवकाशातून आणि जमिनीवरून अखंड संपर्काची तयारी पूर्ण झालीय. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर सूर्योदयाला सुरुवात होईल आणि चांद्रयानाचं सॉफ्ट लॅण्डिंग होईल. 2019 मधील चांद्रयान-2चा अनुभव लक्षात घेऊन इस्रोनं चांद्रयान-3 साठी संपूर्ण काळजी घेतलीय. विक्रम लँडरच्या मागे, पुढे आणि वरील बाजूस अँटेना जोडण्यात आलेत. त्यामुळे लँडर मॉड्युलच्या स्थितीच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट नियंत्रण कक्षाला मिळतील. 


Chandrayaan-3 Landing Sequence : लँडिंगचा क्रम कसा असेल? 



  • चांद्रयान-3 ची चंद्रापासून उंची 30 किमी आहे. 

  • चांद्रयान-3 चा चंद्राच्या जमिनीपर्यंत खाली उतरताना एकूण 745.5 किमी प्रवास होणार आहे. कारण चांद्रयान सरळ रेषेत खाली उतरणार नाही. 

  • एकूण 4 टप्प्यात चांद्रयान-3 चा चंद्राच्या जमिनीपर्यंतचा प्रवास विभागला गेला आहे.

  • रफ ब्रेकिंग फेज, ॲटिट्यूड होल्ड फेज, फाइन ब्रेकिंग फेज आणि टर्मिनल डिसेंट फेज


चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश


भारत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरेल. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया 05 वाजून 47 मिनिटांनी सुरु होईल आणि 06 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान3 चंद्रावर उतरेल.


चांद्रयान-3 हे चांद्रयान-2 चे फॉलो-ऑन मिशन म्हणजे पुढील टप्पा आहे. चांद्रयान-3 मध्ये लँडर आणि रोव्हर पाठवण्यात आला आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करेल. त्यानंतर विक्रम लँडरमधील रोव्हर तेथील पाण्याचे साठे शोधणे आणि चंद्रावरील माती आणि दगड यांची नमुने आणि इतर आवश्यक माहिती गोळा करेल. चांद्रयान 3 च्या लँडरचं नाव विक्रम (Vikram) आणि रोव्हरचं नाव प्रज्ञान (Pragyan) आहे.


ही बातमी वाचा: