मुंबई : भारतासाठी आज अभिमानाची बाब आहे. इस्रोची चांद्रयान-3 मोहिम (Chandrayaan 3 Mission) फत्ते झाली आहे. भारतानं चंद्र कवेत घेतला आहे. चांद्रयान-3 चं यश हा प्रत्येक भारतीयासाठी गर्वाचा क्षण आहे. जे इतर कोणत्याही देशाला जमलं नाही ते भारतानं करुन दाखवलं आहे. भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केलं आहे. यासोबत सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. इस्रो, शास्रज्ञ आणि भारताला शुभेच्छा देणारे अनेक फोटो आणि मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 






चांद्रयान-3 चं चंद्रावर लँडिग हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे.






 


भारताचे माजी पंतप्रधान आणि वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम यांचं स्वप्न आज सत्यात उतरलं, अशी भावना देशवासियांची आहे.


 






इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांचा आनंद आज गगनात मावेनासा झाला आहे. त्यांचा आनंद नेटकऱ्यांनी मीम्समधून व्यक्त केला आहे.