Chandrayaan 3 Live Streaming Record: आज भारतासाठी अभिमानाचा आणि गर्वाचा क्षण आहे. सायंकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले. चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगकडे भारतासह जगभरातील नागरिकांचे लक्ष होते. इस्त्रोने या मोहिमेचं यू ट्यूबवरुन लाईव्ह प्रेक्षपण केले होते. याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे समोर आलेय. चांद्रयान 3 च्या लँडिंगचे दृश्य 30 लाखांपेक्षा जास्त लोकांनी यू ट्यूबवरुन पाहिले. हा जागतिक विक्रम झालाय. इस्त्रोच्या यू ट्यूबने स्पेनच्या इबाई ( Ibai) चा विक्रम मोडीत काढला आहे. Ibai च्या यू ट्यूबला 34 लाख लोकांना एकाच वेळी पाहिले होते. हा विक्रम मोडीत निघाला आहे. 






इस्त्रोच्या कामगिरीनंतर जगभरातून भारतीयांचं अभिनंदन केले जातेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोच्या शास्त्रांचे कौतुक करत देशवासीयंचं अभिनंदन केले. चांद्रयान 3 चं यशस्वी लँडिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकामधून व्हर्चुअल माध्यमातून पाहिले. ‘चांद्रयान-3’ची मोहिम यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त करुन  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हा देशासाठी अभिमानाचा आणि गर्वाचा क्षण आहे


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ''जीवन धन्य झाले आहे. विजयाच्या मार्गावर चालण्याचा हा अभूतपूर्व क्षण आहे. आज भारतामधील प्रत्येक घरात सेलिब्रेशन सुरू झाले आहे. मी चांद्रयान-३ च्या टीमचे आणि देशातील शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो'' शास्त्रांच्या अथक परिश्रमामुळेच आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचण्यात यशस्वी झालोय. असा पराक्रम करणारा भारत पहिलाच देश आहे. आपण जमिनीला आई, आणि चंद्राला मामा म्हणतो. चांदो मामा खूप दूर आहे, असे म्हटले जात होते. पण आता असाही दिवस येईल, चांदो मामा फक्त एक पाऊल दूर आहे, असे मुलं म्हणतील.