श्रीहरिकोटा : संपूर्ण भारताचं लक्ष लागलंय ते भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेकडे. कारण आता लँडिंगचं काऊंटडाऊन सुरू झालाय आणि उद्या म्हणजे 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4  मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार आहे. भारतासाठी हा क्षण गौरवाचा आणि अभिमानाचा असेल. सध्या चांद्रयान-3 चंद्रापासून अवघ्या 25 किलोमीटवर असून लँडिंगची तयारी सुरू आहे. दरम्यान, रशियाच्या लुनाबाबत दोन दिवसांपूर्वी झालेली दुर्घटना आणि भारताच्या चांद्रयान-२चा मागचा अनुभव लक्षात घेता इस्रोनं मोठी काळजी घेतलीय. चांद्रयान-३च्या लँडिंगपूर्वी दोन तास अगोदर आढावा घेतला जाईल आणि लँडिंगसाठी वातावरण पोषक नसेल तर लँडिंग 27 ऑगस्टपर्यंत लांबणीवर जाऊ शकतं, अशी माहिती इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश एम. देसाई यांनी दिलीय.


भारताचं चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहे. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्रावर लँड होणार आहे अशी माहिती इस्रोनेच तशी माहिती दिली आहे. सध्या चांद्रयान-3 चंद्रापासून 15 मैलावर आहे त्यामुळे चांद्रयान 3 लँडिंग होण्याचं काऊंटडाऊन सुरु झाले आहचांद्रयानाला चंद्रावर उतरवण्याच्या दोन तास आधी इस्रोकडून लँडर आणि चंद्राच्या परिस्थितीचा अभ्यास केला जाणार आहे. चंद्रावरील वातावरणाचा अभ्यास करुन त्यानंतर लँडरला चंद्रावर लँड करण्याचा निर्णय घेतला जाईल


लँडर आणि चंद्राची स्थिती लँडिंगसाठी योग्य नसेल तर हे 27 ऑगस्टपर्यंत सर्व प्रक्रिया पुढे ढकलली जाईल. पण त्याआधी 23 ऑगस्टला लँडरला चंद्रावर लँड करणार असल्याचं इस्त्रोचे शास्त्रज्ञ निलेश एम. देसाई यांनी सांगितलं.






चांद्रयान-3 चा आतापर्यंतचा प्रवास कसा होता?



  • 14 जुलै रोजी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान-3 यशस्वीपणे प्रक्षेपित 

  • 5 ऑगस्ट रोजी लँडरने  चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला 


सध्या चांद्रयान 3  लॅण्डिंगसाठी सज्ज 


19 ऑगस्टला रशियाचं लुना-25 मिशन फेल झालं. चंद्रावर क्रॅश लँडिंग झालं. रशियाचं मिशन फेल झालं असलं तरी ते भारताहून उशिराने चंद्राच्या दिशेने झेपावलं आणि लवकर चंद्राच्या कक्षेत पोहोचलं. लुना-२५ पाचच दिवसात चंद्राच्या कक्षेत दाखल झालं तेच चांद्रयानला 21 दिवस लागले खरं तर चांद्रयानच्या लँडिंगमध्ये काही आव्हानही आहेत


चंद्रावरचा एक दिवस  पृथ्वीवरच्या 14 दिवसांएवढा असतो. चांद्रयान- ३चे आयुष्य फक्त एकादिवसा पुरतं आहे म्हणजे विक्रम लँडर आणि रोव्हर उपकरणांची निर्मिती चंद्रावर एक दिवस  काम करण्यापुरती करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे ही सर्व उपकरणं सौर ऊर्जेवर चालणारी आहेत.


रात्रीच्यावेळी चंद्रावर मोठ्या प्रमाणात थंडी असते, तापमान  उणे 100 डिग्रीच्या  खाली असते. इतक्या कमी तापमानात काम करण्याच्या दृष्टीने  इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची  निर्मिती केलेली नाही. या वातावरणात ही उपकरणं गोठली जातील,कामच करणार नाहीतम्हणून 23 ऑगस्टशिवाय लॅण्डिंगला पर्याय नाही. चांद्रयान लँडिंगचं काउंनडाऊन सुरु झाले आहे. रशियाचं चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचं  स्वप्न तर भंगलं त्यामुळे आता लक्ष लागलंय.